देशातील ‘इतके’ लोक मास्कच वापरत नाहीत!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. मात्र तरी देखील लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या तरी नियमित मास्क वापरण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही; परंतु देशातील ५० टक्के लोक अजूनही मास्क वापरत नाहीत, अशी माहिती सरकारने दिली. विशेष म्हणजे मास्क वापरणाऱ्यांपैकी ६४ टक्के लोक मुखपट्टीचा वापर केवळ तोंड झाकण्यासाठी करतात.

मास्क लावून देखील या लोकांचे नाक उघडेच असते, असे एका सर्वेक्षणातून समोर आल्याचे आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.

या सर्वेक्षणानुसार मास्क वापरणाऱ्या ६४ टक्के लोकांपैकी २० टक्के लोकांचा मास्क हनुवटीवर तर २ टक्के लोकांचा मास्क गळ्यावर असतो.

आरोग्य मंत्रालयाच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत ते गुरुवारी बोलत होते. गेल्या दोन दिवसांपासून देशात दररोज २० लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात येत असून,

जून अखेरपर्यंत दैनंदिन चाचणी संख्या ४५ लाखांपर्यंत होईल, असे भार्गव यांनी सांगितले. सरकारी आकडेवारीनुसार सलग १० आठवडे कोरोना संसर्गाचा दर वाढता होता. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या घटत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe