म्युकरमायकोसिसच्या मुकाबल्यासाठी सर्व डॉक्टरांनी एकत्र यावे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- म्युकरमायकोसिस या आजाराचे गंभीर स्वरूप विचारात घेता याकरता योग्य ती पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने सर्व डॉक्टरांनी एकत्र येवून नियोजन करावे,असे आवाहन जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

यात प्रामुख्याने कान, नाक, घसा तज्ञांवर विशेष जबाबदारी राहणार आहे. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी प्रशासनाने व डॉक्टरांनी एकत्र येवुन यासाठी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे.

सदरच्या आजारावरील रुग्णांना शासनामार्फत महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश करण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहेत.

परंतु या जनआरोग्य योजनेत कान, नाक व घसा यावर उपचार करणा-या ज्या रूग्णालयांचा समावेश नाही,त्यांचा तातडीने समावेश करणे देखील गरजेचे आहे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना उपचारासाठी सर्व डॉक्टरांनी एकत्र येवून आपले विशेष योगदान द्यावे,अशी विनंती देखील कोल्हे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News