अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर शहरात विविध केंद्रांवर लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे. मात्र लसींचा साठा त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेकदा या मोहिमेत अडथळा निर्माण होतो.
सध्याही लस उपलब्ध नसल्याने शनिवारपर्यंत लसीकरण पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले.
तसेच लसीकरण केंद्रावर टोकन सिस्टीम, नावे जाहीर करणे आदी अवलंबले तरीही अद्याप नागरिक गर्दी करण्याचे कमी करत नाहीत.
या गर्दीचा फटका नागरिकांनाच बसत आहे. यातून कोरोना फैलावण्याचा धोका आहे. तसेच विनाकारण नागरिकांना हेलपाटा पडत आहे.
त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणखी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. या दोन दिवसात त्याचे नियोजन केले जाईल. त्याच प्रमाणे लस ज्या प्रमाणात उपलब्ध होतील,
त्यानुसार लसीकरण सोमवारपासून सुरू करायचे की कधी हे ठरविण्यात येईल. त्यानुसार नागरिकांना माहिती देण्यात येईल, असेही आयुक्त गोरे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम