अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी येथे अंड्याचे पैसे न दिल्यामुळे एकाला शिविगाळ व मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी तिघांविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बंडू दत्तु पावडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,
की दि. १७ मे रोजी साडेसात वाजेच्या सुमारास कुंभारवाडी येथिल मारुती मंदिरासमोर शिवनाथ घाडगे याने अंड्याचे पैसे दिले नाही, म्हणून मला शिवीगाळ केली. यावेळी राजू घाडगेही तेथे आला,
त्यानेही शिवीगाळ करण्यास सुरवात केली. भांडणाचा आवाज ऐकून तेथे सुनिल घाडगे हा हातात काठी घेऊन आला व त्याने काहीही न बोलता माझ्या हाताच्या कोपरावर काठी मारली.
त्यानतंर शिवनाथ व राजू घाडगे यांनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात वरील तिघांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ७२/२०२१ नुसार भा.दं.वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार शिंदे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम