जयपूर :- जन्मदात्या बापानेच आपल्या अवघ्या 13 वर्षांच्या मुलीला विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राजस्थानच्या जयपूरमध्ये आरोपी व्यसनी वडिलांनी 13 वर्षाच्या मुलीची सात लाख रुपयांमध्ये बालविवाहासाठी मुलीची विक्री केल्याचेही समोर आले आहे. ही घटना जून 2019 मध्ये घडली.
पोलिसांनी आरोपी वडील आणि इतर दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असून ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचेही समोर आले.
पीडित मुलगी सिवाना तहसील गावात राहत होती. तिचे वडील दारुच्या आहारी गेले होते. 22 जून रोजी गोपा राम माली नावाच्या व्यक्तीने आरोपी वडिलांना तुमच्या मुलीच्या लग्नासाठी चांगल्या घरातील मुलगा पाहिल्याचे सांगितले.
त्याच्या सांगण्यावरुन आरोपी वडील मुलीला नवऱ्या मुलाला भेटवण्याच्या निमित्ताने सिवाना येथे घेऊन गेले. पण तेथून पुन्हा परतल्यावर त्यांच्यासोबत मुलगी नसल्याने कुटुंबीयांनी मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली.
यावर आरोपी वडिलांनी तिला तिच्या मामाच्या घरी सोडलं आहे, असं सांगितलं. तसेच मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुलीचे वडील आणि ज्या व्यक्तीला मुलगी विकली सांवला राम गुप्तासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.