अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- देशातील कोरोना बळींची दैनंदिन संख्या पुन्हा चार हजारांच्या पुढे गेली. दिवसेंदिवस कोरोनाच्या चाचण्या वाढत आहेत. चाचण्या वाढूनदेखील रुग्णसंख्या कमी आढळत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.
परंतु त्याचवेळी कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेत भर टाकत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार गत २४ तासांमध्ये देशभरात २ लाख ५९ हजार ५५१ नवे रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ कोटी ६० लाखांच्या पुढे गेला आहे.
गत २४ तासांमध्ये ४,२०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकून बळींचा आकडा २ लाख ९१ हजार ३३१ झाला आहे. सध्या देशभरात ३० लाख २७ हजार ९२५ सक्रिय रुग्ण आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम