अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 423 कोटींची एफआरपी थकविली आहे. दरम्यान कोरोनाच्या महामारीने आधीच शेतकरी आर्थिक संकटात असताना हातीही पैसाही नसल्याने बळीराजा मोठा हतबल झाला आहे.
कोरोना सारख्या संकटामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करण्याऱ्या बळीराजाला आता स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी साखर कारखान्यांचे उंबरे झिजावू लागले आहे. मात्र पैसे मिळत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान गेल्या वर्षी पुरेसा पाऊस पडला.
त्यामुळे उसाचे उत्पादनही चांगले मिळाले. जाे कारखाना जास्त भाव देईल त्या कारखानाला ऊस अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली होती. शेतकऱ्यांनीही कारखान्यांच्या दबावाखाली न येता इतर कारखान्यांना ऊस दिला.
उसाचे पेमेंट वेळेवर मिळेल, असे सर्वच कारखाने सांगत होते; परंतु गाळप हंगाम संपून महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला. मात्र, जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे दिले नाहीत.
पैशांसाठी शेतकरी कारखान्यांचे उंबरे झिजवत आहेत. मात्र शेतकऱ्यांना पैशाऐवजी केवळ आश्वासने मिळत आहे. त्यामुळे शेतकरीही हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे कारखान्यांकडे अडकलेले आहे. याशिवाय काहींना नवीन उसाची लागवड करायची आहे.
मशागतीला पैसे लागतात. खतांच्या किमती वाढल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी खोडवा व सुरू उसांना खताची मात्रा देणे गरजेचे आहे; परंतु कारखान्यांनीच पेमेंट न दिल्याने ऊसपिकासह खरिपाची तयारी करणार कशी, असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम