विनाकारण फिरणाऱ्याची कोरोना चाचणी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात दररोज कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असताना देखील नागरीक शासकीय नियमानाचे पालन न करता विनामास्क, तसेच विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने

श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह विनाकारण फिरणाऱ्यां नागरीकांची कोरोना चाचणी केली.

तर शहरात ४ विनापरवानगी चालु असलेल्या दुकानांवर कारवाई करत २ दुकानांना प्रत्येकी १० हजाराचा दंड करण्यात आला तर दोन दुकाने सील करण्यात आले.

श्रीगोंदा नगरपालिका तसेच श्रीगोंदा पोलिस स्टेशन यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रस्त्यावर विनाकारण फिरत असलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची मोहिम राबविली.

यात आज दिवसभरात १०० नागरिकांची चाचणी घेण्यात आली, त्यात १ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शहरात कोरोना चाचणीची मोहीम राबवताच कामाव्यतिरिक्त मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याची प्रतिक्रिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News