अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी या दोघांना पंजाब येथून अटक केली आहे. ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती.
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आज सुशील कुमारला पंजाबमधून अटक केली आहे. तसेच सुशील कुमारचा खाजगी सचिव अजय कुमारला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
नेमके प्रकरण काय ? जाणून घ्या :- सुशील कुमार आणि त्याच्या साथीदाराने 4 मे रोजी सागर राणा याच्यासहीत चार जणांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली.
हल्लेखोरांपैकी एक प्रिन्स दलालने या घटनेचे व्हिडिओ बनविले होते. घटनास्थळी पोलिस आल्यावर सर्वजण तेथून पळून गेले. परंतु, प्रिन्स पकडला गेला. पोलिसांना झडती घेत असताना एक मोबाईल फोन सापडला.
फोनमधील व्हिडीओ द्वारे झाला खुलासा :- सापडलेल्या फोनमध्ये काही व्हिडिओ आढळले. या व्हिडीओमध्ये सुशीलकुमार आपल्या साथीदारांसहसागर राणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे.
तसेच छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही सुशील कुमार आपल्या 20 ते 25 साथीदारांसह सागर राणा आणि अन्य दोघांना मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान त्यादिवसांपासून सुशील आपल्या साथीदारांसह फरार होता.
सुशीलचा शोध घेणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. याशिवाय सुशीलचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणाऱ्यास ५० हजारांचा रोख पुरस्कार दिला जाईल अशी देखील घोषणा केली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम