फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळवण्यासाठी महावितरण कर्मचारी उतरले संपावर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आदींना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आला आहे.

आता यातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणे व इतर मागण्यासाठी वीज कर्मचारी सोमवारी (दि.24) राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहे.

नेमक्या काय आहेत मागण्या? :- जाणून घ्या वीज कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन अग्रक्रमाने त्यांचे व कुटुंबियांचे लसीकरण करण पूर्ण करावे, कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांचा वारसांना पन्नास लाख रुपये अनुदान द्यावे, वीज बिल वसुलीची सक्ती थांबवावी

त्याच प्रमाणे मेडिक्लेम पॉलीसीत सन 2020 पासून उर्जा विभागाकडून संघटनांना विचारात न घेता परस्पर टिपीए नेमणे यामुळे कर्मचारी वर्गात असंतोष आहे.

राज्य भरात करोना बाधित शेकडो कर्मचारी उपचार घेत असताना सुमार दर्जाचा टिपीए नेमून उर्जा विभागाने कोणाचे हित साधले? याची चर्चा कर्मचारी वर्गात आहे. व त्याचे रुपांतर असंतोषात झाले असून संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

काम बंद आंदोलनाचे असे असणार स्वरूप…. :– काम बंद आंदोलन असले तरी कोविड सेंटर, दवाखाने यांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील असतील. मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये येत नसलेली नवीन विद्युत पुरवठा देणे,

वीज बील भरण्यास आग्रह करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीज चोर्‍या पकडणे, ग्राहकांचे वीज बील दुरुस्त करणे, मान्सुनपुर्व कामे करणे,

सर्व मेंटेनन्स व टेस्टींगची कामे अशी कुठलेही कामे व इतर कोणतीही कामे कर्मचारी करणार नाहीत अशी माहिती वीज कामगार महासंघाचे नाशिक परिमंडळ अध्यक्ष संजय दुधाने यांनी दिली.

या संपामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघांसह वर्कस फेडरेशन, सबऑर्डीनेट इंजिनियर असोशिएशन, वीज तांत्रिक कामगार युनियन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन,

वीज कामगार काँग्रेस या कृती समितीतील प्रमुख सहा संघटना प्रदेश पातळीवरील पदाधिकार्‍यांच्या ऑनलाईन झालेल्या बैठकीत हा निंर्णय घेण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News