अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात शनिवारी केवळ १८५६ कोरोनाबाधित आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे. तर ३०४८ रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले.
नवीन बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायकबाब ठरते आहे. जिल्ह्यात शनिवारी ३०४८ रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २७ हजार ६०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.२७ टक्के इतके झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ७४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत १८५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली असून, ती १६ हजार ३१५ इतकी झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम