अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दारुड्यानी तब्बल १४ कोटी २२ लाख ७९ हजार ६४४ लिटर दारू सेवन केली आहे. दरम्यान दारुड्यांच्या हा सहभागामुळे शासनाच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.
यामध्ये तब्बल १४ कोटी ७९ लाखांचा महसूल शासनाला मिळाला आहे. २०१९-२० च्या तुलनेत दारू विक्रीतून शासनाला २०२०-२१ मध्ये जास्त महसूल मिळाला आहे. कोरोनामुळे सध्या दारूचे दुकाने बंद आहेत. मात्र सकाळी ७ ते ११ या वेळेत दारूच्या घरपोहोच विक्रीला परवानगी आहे.
या घरपोहोच विक्रीलाही मद्यप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिअरच्या तुलनेत जिल्ह्यात देशी-विदेशी मद्याची सर्वाधिक जास्त विक्री झाली आहे. कोरोनामुळे बहुतांशी व्यवसायांवर विपरित परिणाम होऊन आर्थिक उत्पादनात घट झाली आहे.
दारू विक्रीवर मात्र काहीच परिणाम झालेला दिसत नाही. बहुतांशीकाळ दुकाने बंद राहिली तरी मद्यप्रेमींनी संधी मिळेल तेव्हा दारू खेरदी करत शासनाच्या महसुलात भर टाकल्याचे दिसत आहे.
दोन वर्षातील महसूल
- २०१९-२० – १४ कोटी ५८ लाख रुपयांचा महसूल मिळाला
- २०२० – २१ – १४ कोटी ७९ लाखांचा महसूल मिळाला
दोन वर्षांतील दारू विक्री
- २०१९-२० : १४ कोटी ५३ लाख ५९ हजार ७११ लिटर
- २०२०-२१ : १४ कोटी २२ लाख ७९ हजार ६६६ लिटर
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम