मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजेंचा रुद्रावतार प्रथमच पाहायला मिळाला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-खासदार संभाजीराजे भोसले हे छत्रपती आहेत. त्यांनी पहिल्यांदाच असा रुद्रावतार घेतलेले आम्हाला पाहायला मिळाले. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप ग्रामविकस मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाविकास आघाडीवर रोष व्यक्त केला आहे.

त्यांच्या नेतृत्वाखालीच मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

ते कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार वेळा पत्र पाठवून त्यांनी मराठा आरक्षणावर बैठक घेण्याची विनंती केली होती; परंतु मोदींनी याकडे लक्ष दिले नाही, अशी टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे.

खासदार संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर आघाडी सरकार सकारात्मक आहे. त्यांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी नाशिक येथील कार्यक्रमादरम्यान संतप्त भावना व्यक्‍त केल्या.

मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा 27 मे पासून राज्यभर आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा त्यांनी दिला होता. याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. खासदार संभाजीराजे हे छत्रपती आहेत. त्यांनी पहिल्यांदाच असा रुद्रावतार घेतलेले आम्हाला पाहायला मिळाले.

त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संभाजीराजे यांनी मोदी यांच्यासह आघाडी सरकारवरही संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी व्यक्त केलेली ही नाराजी योग्यच आहे. त्यांची नाराजी आम्ही समजू शकतो, असे मुश्रीफ म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe