अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- घोडेगाव येथील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. येथे एक हजाराहून अधिक म्हशीची विक्री होवून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती.
मात्र आता कोरोना संसर्गाची स्थितीमुळे तीन महिन्यापासून बाजार बंद असल्याने हजारोंची रोजीरोटी थांबली आहे. घोडेगावसह, चांदे, सोनई,
शनिशिंगणापुर, लोहगाव, झापवाडी, शिंगवेतुकाई, वांजोळी येथील व्यापारी, दलाल व काही शेतक-यांनी व्हाॅटसअप ग्रुप तयार करुन यावर गाय व म्हशीचे छायाचित्र,
व्हिडिओ व त्यांचा बायोडाटा टाकत विक्री सुरु केली आहे. रस्त्यावरील स्थिती लक्षात घेवून हा व्यवसाय सध्या जिल्ह्यातच केला जात आहे.
अगोदर जनावराचे छायाचित्र पाठविले जाते. व्हिडिओ काॅलवर जनावर चालून दाखवले जाते. फोन पे, गुगल पे किंवा आरटीजीएस द्वारे पैशाची देवाण- घेवाण होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम