‘मला पर्यटनाची हौस नाही, आम्ही लोकांना मदत करत असल्याने विरोधक निराश’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- मी पर्यटनमंत्री जरी असलो तरी पर्यटन करण्याची मला हौस नाही. काही लोक फोटो काढण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी देतात. आमचा हेतू लोकांना मदत करण्याचा आहे आणि आम्ही मदत करीत असल्याने विरोधक निराश झाले आहेत.

त्यामुळे त्यांनी टीका करत राहावी’, असं प्रत्युत्तर पर्यटन मंत्री तथा मुंबई शहर उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे. मुंबई उपनगरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

त्याच वेळी नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात देखील उपनगरातील अनेक कोळीवाडा भागात आणि समुद्र किनारी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशा परिस्थितीत मुंबई शहर उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे पाहणी करायला बाहेर कुठे दिसत नाहीत अशी, टीका भाजपने केली होती.

त्यालामंत्री ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी रविवारी उपनगरात एमएमआरडीएकडून बांधण्यात येणाऱ्या मलाड कांजूरमार्ग या ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरची पाहणी केली.

मुंबई उपनगरातील एमएमआरडीए यांच्याकडून बांधण्यात येणारे वेगवेगळे पूल रस्ते याची पाहणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली.

मान्सूनपूर्व वेगवेगळ्या कामाचा आढावा देखील आदित्य ठाकरे यांनी घेतला. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, पुढील कालावधीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार लहान मुलांसाठी सेंटर उभे करत आहे.

तिसऱ्या लाटेमध्ये मुलं बाधित होऊ नये अशी अपेक्षा जरी असली तरी तयारी करण्याच्या हेतूने महापालिका आणि राज्य सरकार सज्ज होत आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलांसाठी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe