राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता ! आता मुख्यमंत्रीच म्हणाले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसले आहे दररोज 70 हजारांनी वाढणार संख्या आता 30 हजारांवर गेली आहे.

यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच आहे. पण दिलासा देखील मिळाला आहे. पण धोका अजून टळलेला नाही.

लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर पुन्हा लॉकडाऊनवाढणार का ? हा प्रश्न पुन्हा एकदा आता समोर आला आहे.

राज्यातील अनेक भागात कोरोनाचा संसर्ग झाला. अनेक ठिकाणी अजूनही कहर सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला.

अनेकांनी जीव गमवले. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पसरला. त्यामुळे संकट वाढलं. अजूनही संकट टळलेलं नाही. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की, 1 जूनपासून टप्प्याटप्प्यानं निर्बंध शिथिल केले जातील.

‘ पण याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं ही त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर ‘राज्याच्या हितासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात कटूपणा घेण्याचीही तयारी आहे.

‘ असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. टास्क फोर्समधील डॉक्टरांसोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय. ‘नागरिकांनी सहकार्य केलं. पण अजूनही यश मिळालेलं नाहीये.’ असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News