अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- स्टील चोरणार्या टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील सात जणांकडून 1 हजार 300 किलो स्टील, एक दुचाकी, एक अपे रिक्षा असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहर पोलिसांमध्ये राजेश शांतीलाल कोकणी यांनी साई सिटी येथील बांधकामावरून पंधराशे किलो स्टील चोरी, कचरू भास्कर निकम
यांनी गवारे नगर येथील बांधकामावरून 170 किलो स्टील तर नीरज मदनलाल कासलीवाल सरकारवाडा सराफ बाजार येथून 350 किलो स्टील चोरीला गेल्याच्या तक्रारी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, कि या चोरीतील आरोपी गटया उर्फ विशाल राजेंद्र शिंदे कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकी येथे आहे.
त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने सहा साथीदारांची नावे सांगितली. साईसिटी येथील काटवनात लपविलेले स्टील पोलिसांना दाखविले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तेराशे किलो स्टील, एक दुचाकी, एक अॅपे रिक्षा असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गटया उर्फ विशाल राजेंद्र शिंदे, दीपक अर्जुन दवंगे, मुकेश मुनीर शेख, सोमनाथ भाऊलाल सुरासे, मुकुंदा ज्ञानेश्वर पवार, पवन रमेश भालेराव, आकाश अंकुश खरात सर्व राहणार खडकी तालुका कोपरगाव यां अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम