अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कडक निर्बंध घातले आहे. दरम्यान जिल्हाधिकार्यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्या संगमनेर मधील दोन कापड दुकानांसह बेकायदेशिररित्या चालविल्या चार दारु दुकानांवर स्थानिक प्रशासनाने कायदेशिर कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, त्यामध्ये संदीप विष्णु वर्पे यांचे मन मार्केट क्लॉथ स्टोअर्स व बाळासाहेब मुटकुळे यांचे साई शॉपी क्लॉथ स्टोअर्स ही दोन कापडाची दुकाने सुरु असलेली आढळून आली.
सदर दोन्ही दुकाने सील करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संगमनेर तालुका हद्दीत कोल्हेवाडी, तळेगाव, नान्नजदुमाला या गावांमध्ये चार बेकायदेशिररित्या दारु विक्रेत्यांवर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व कर्मचार्यांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
दारु विक्रेत्यांकडून 10 हजार 638 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करोना काळात नियमांचे उल्लंघन करुन आस्थापना चालु ठेवू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. मात्र तरीही व्यावसायिक चोरी छुप्या पद्धतीने आपला व्यवसाय सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम