अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील कोरोना रुग्णांचा आकडा शुन्यावर पोहोचला असून, ग्रामपंचायतीद्वारे केलेल्या उपाययोजनांमुळे भोसे गाव कोरोनामुक्त झालेआहे.
अशी माहिती गावचे सरपंच विलास टेमकर, उपसरपंच संदीप साळवे, युवानेते अशोक टेमकर यांनी दिली आहे. कोरोना काळात भोसे ग्रामपंचायततर्फे सरपंच विलास टेमकर
यांनी गावामध्ये सॅनिटाझर फवारणी त्याचबरोबर कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना तातडीने विलगीकरण किंवा उपाययोजना मिळण्यावर भर दिल्याने, या गावातील रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने घट झाली.
त्याचबरोबर गावामध्ये आरोग्य विभागामार्फत कोरोनाचाचणीवर भर देऊन ग्रामपंचायतद्वारे महत्त्वाचे निर्णय घेतले. मागील काही दिवसांपूर्वी या गावांमध्ये सरासरी पंचवीस ते तीस रुग्ण आढळले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीने दखल घेऊन गावांमध्ये नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले.
त्यास गावकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कालावधीमध्ये सरपंच विलास टेमकर, उपसरपंच संदीप साळवे, युवानेते अशोक टेमकर यांनी गावांमध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विभागामार्फत एक टीम तयार करून कोरणाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी दाखल केले.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील गाव कोरोनामुक्त करण्यासाठी वेळोवेळी विशेष सूचना केल्या व त्या पद्धतीने आम्ही सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे तंतोतंत पालन केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होऊन भोसे गावामध्ये आज कोरोना रुग्ण संख्या शून्य आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम