दुर्दैवी ! कोरोनाने उद्ध्वस्त करून टाकलं कुटुंब

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- आईसह कुटूंबातील तीन मुलांना कोरोनाने गाठले, बघता बघता तिघांनाही कोरोनाने हिरावून घेतले आणि डोळ्या देखत कोरोनाने कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं.

संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील ओझर बुद्रूक या गावात हि घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील अवघी दीड हजार लोकसंख्या असलेले ओझर बुद्रूक हे प्रवरा नदीकाठी आहे.

तालुक्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले.

याच गावात राहणारे शेळके कुटुंबाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कुटूंबातील छबुबाई शिवराम शेळके ( 75 ) व त्यांची मुले अनिल ( 46 ), अॅड. सुधाकर ( 55 ) व शरद ( 40 ) यांचा कोरोनाने एकापाठोपाठ मृत्यू झाला.

कोविडबाधेमुळे शिर्डी, श्रीरामपूर, नगर व संगमनेर येथे उपचार सुरू होते. परंतु शेवटी त्यांना मृत्यूने गाठलेच. अचानक लागोपाठ पडलेल्या मृत्यूच्या छायेमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले. सदस्यांना आपल्या निकटवर्तियांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe