चिखलामध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

लोणी – राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात चिखलामध्ये भरलेल्या स्थितीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह  आढळून आला.

या तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षाचे असून या प्रकरणी बापूसाहेब यांच्या खबरीवरुन लोणी पोलिसांनी  घटनास्थळी भेट दिली. स.फौ घोडे हे पुढील तपास करीत आहेत.

हा तरुण कोण? त्याचा मृत्यू कसा झाला? चिखलात मृतदेह कसा? काही घातपात झाला का ? अशा बघ्या नागरिकांमध्ये चर्चा होती.