अनैतिक संबंधात अडथळा येतो म्हणून केला खून : न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  अनैतिक संबंधात अडथळा येतो म्हणून एकाचा खून केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे घडली होती.

या प्रकरणी विशाल प्रदीप तोरणे यास न्यायाधीश महंमद नासीर एम. सलीम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सरकारी वकील पी. पी. गटणे यांनी माहिती दिली, की दि. ५ एप्रिल रोजी विकास इंद्रभान पवार हा त्याची पत्नी आरोपी विशाल प्रदिप तोरणे याच्या घरी आहे की नाही, हे पाहण्यासाठी गेला होता.

यावेळी तेथे विशाल तोरणे व मयताची पत्नी या दोघांनी इंद्रभान हा त्यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरतो म्हणून त्यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून त्याचा खून केला. अशी फिर्याद मयताचे भाऊ अण्णासाहेब पवार यांनी श्रीरामपूर पोलिसात दिली होती.

या वरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी तोरणे यास अटक केली होती. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी केला.

त्यांनी मयताचे व आरोपींचे कपडे, तसेच ज्या दांडक्यांनी मयतास मारहाण झाली, ते दांडके जप्त करून नाशिक येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे १३ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.

यामध्ये घटनास्थळाचे पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अधिकारी आदींच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. ‘मयत हा आरोपीस मारण्यासाठी गेला होता व स्वसंरक्षणार्थ आरोपीने हे कृत्य केले’, असा बचाव आरोपीच्या वतीने करण्यात आला; परंतु सरकारी पक्षाने केलेला

आरोपीने जाणीवपूर्वक मयतास मारहाण करून त्याचा खून केल्याचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला व आरोपीस जन्मठेप व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर मयताच्या पत्नीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News