अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- अनैतिक संबंधात अडथळा ठरतो, म्हणून प्रेयसीच्या मदतीने तिच्या पतीचा खून केल्याप्रकरणी पढेगाव येथील प्रियकर विशाल प्रदीप तोरणे यास श्रीरामपूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महंमद नासीर एम. सलीम यांनी सोमवारी दहा हजार रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मृत विकास यांचे बंधू अण्णासाहेब पवार यांनी ६ एप्रिल २०१८ रोजी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यात म्हटले होते, ५ एप्रिल २०१८ रोजी माझा भाऊ विकास हा विशाल तोरणे याच्या घरी आपल्या पत्नीस शोधण्यासाठी गेला. तेथे वाद झाले. त्या दोघांनी आपल्या अनैतिक संबंधांत अडथळा नको,
म्हणून विकासला लाकडाने मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तत्कालीन पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांनी या प्रकरणाचा तपास केला.
मृताचे व आरोपीचे कपडे व मारहाण केलेले लाकूड न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल, पोस्टमार्टेम अहवाल या खटल्यात उपयोगी ठरला.
सरकारी पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील अॅड. प्रसन्न गटणे यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट अडली फय्याज पठाण व विलास घाणे यांनी मदत केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम