अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराततच साजरी करावी.
अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गाव हे आहे. दरवर्षी त्यांची चौंडी येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात येत होती.
मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने ती साध्य पध्दतीने साजरी होणार असल्याचे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील वंशज माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी जाहीर केले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कुशल प्रशासक व आदर्श न्याय पद्धतीच्या जोरावर रयतेच्या जगण्यात खऱ्या अर्थाने राम आणला. जेव्हा हिंदुस्तान परकिय राजवटीमुळे शंत खंडित झाला होता.
त्यास अखंडित ठेवण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती व शेकडो मंदिरांचा जीर्णोध्दार करत हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित केले.
देशाला अखंडित ठेवले. त्यांच्या महान स्मृती पुढे नतमस्तक होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरातच साजरी करावी असे आवाहन प्रा.राम शिंदे युवा मंचचे अध्यक्ष पांडुरंग माने यांनी केले आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम