शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करावे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांसह महिलांच्या सोयीसाठी केडगाव शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. यावेळी सागर सातपुते, भुषण गुंड, गणेश सातपुते, बापू सातपुते, अविनाश औटी, विनायक जगदाळे, शुभम गायके, सोनू फाळके, मयुर कुलकर्णी, राष्ट्रवादी विद्यार्थीचे उपाध्यक्ष विशाल सकट, गणेश सातपुते मित्र मंडळ व विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

शिवाजीनगर, वैष्णवी नगर, मराठा नगर, एकनाथ नगर, रभाजी नगर या भागातील नागरिकांना केडगाव व शहरातील लसीकरण केंद्रावर जावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांना लांब जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.

सध्याची परिस्थिती भयानक व बिकट आहे. आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी असल्याने गर्दीत ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय होत आहे. तसेच कोरोना लसीकरण केंद्रावर असलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव छपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

लसीकरण केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरु केल्यास येथील नागरिकांची सोय होऊन इतर केंद्रावर होणारी गर्दी देखील कमी होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe