अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- नगर शहर विकासाला चालना देण्याबरोबरच रस्त्याचे जाळे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. भिस्तबाग महाल ते भिस्तबाग चौक ते कुष्ठधाम रोड प्रोफेसर कॉलनी चौक ते तोफखाना पोलिस चौकी दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून हे काम लवकरच पूर्ण होवून नागरिकांसाठी खुला होणार आहे.
हा रस्ता शहरातील मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या रस्त्यावरील विद्युत तारा जमिनी अंतर्गत घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. शहरातील हा पहिला रस्ता विद्युत तारा विना निर्माण झाला आहे.
शहराच्या सर्वागीन विकासासाठी प्रयत्न सुरू असून टप्प्या टप्प्याने ते प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले्.
मनपाच्या माध्यमातून तोफखाना पोलिस स्टेशन ,प्रोफेसन कॉलनी चौक, कुष्ठधाम रोड, भिस्तबाग चौक ते महालापर्यतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप व मा.महापौर बाबासाहेब वाळके यांनी पाहणी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम