जिल्ह्यात ‘होम आयसोलेशन’ बंद; कोविड सेंटरची संख्या वाढविणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नगर, पुणे जिल्ह्यासह 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. कारण अनेक करोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत.

त्यामुळे अनेकांना करोनाची लागण होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती.

या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीनंतर टोपे यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीतील निर्णयाची माहिती दिली.

राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.

त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्यातील ‘होम आयसोलेशन’ बंद करण्यात आलेली जिल्हे बुलडाणा, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ,

अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा. सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, नागपूर.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News