कोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिसची लागण होऊन तरुणाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ म्युकर मायकोसिस या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच जिल्ह्यात या आजाराची रुग्णसंख्या देखील वाढली आहे.

नुकतेच श्रीरामपूर येथील एका 27 वर्षीय तरुणाचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संबंधित तरुणास गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याने येथील श्रीरामपुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन घरी गेला होता.

मात्र दोन दिवसानंतर 21 मे रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा पुणे येथील रुबी हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यावेळी त्यास म्युकरमायकोसिस झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरु केले.

त्याच्या डोळ्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र काल त्यास जास्त त्रास होऊ लागल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हा 27 वर्षीय तरुणाचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe