अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. यामुळे रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शासनाकडून लाहोर निर्बंध लागू करण्यात आले आहे.
व नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र नागरिकांसह काही व्यापाऱ्यांकडून नियमांचं पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येत आहे. अशा बेजबाबदारांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

नुकतेच कोविड नियमावलीचे पालन न केल्याने राहाता नगरपरिषदेच्या भरारी पथकाने शहरातील विविध ठिकाणी दुकाने सिल करत काही दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
यात 5 मटन विक्रेत्यांवर दंडात्मक, 3 किराणा दुकान पुढील आदेशापर्यंत सिल तर दोन किराणा दुकानांवर 6 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
लॉकडाऊनचे नियम तोडल्याने शहरातील त्रिशूलनगर मधील 2 किराणा दुकान, गावठाण हद्दीत 3 किराणा दुकान तसेच मटन मार्केट मधील 5 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच नगरपालिकेने ठरवून दिलेल्या कालावधीत रॅपिड अँटीजेन टेस्ट न केल्याने लोकरुचीनगर भागातील एका मेडीकल कर्मचार्यास 500 रुपये दंड करण्यात आला आहे.
मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी कोविड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन व्यापारी वर्गाला केले आहे. दरम्यान या कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम