बांधकाम साहित्याशी संबंधित दुकाने उघडण्यास परवानगी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- गेल्या आठवडय़ात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली.

दरम्यान पावसाळ्याच्या तोंडावर घरांची दुरुस्ती किंवा मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या बांधकाम साहित्याशी संबंधित दुकाने आणि व्यवसाय यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

मात्र आता बांधकाम व्यवसाय आणि साहित्याशी संबंधित दुकाने यांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार निर्बंधांमध्ये सूट देत ही दुकाने खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास सदर व्यावसायिक दुकानांना अन्य अत्यावश्यक सेवांसाठी लागू असणाऱ्या वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News