दिलासादायक ! राज्यात गेल्या 10 दिवसात कोरोनामुक्तांची संख्या वाढली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राज्यात आज तर 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मात्र दिलासादायकबाब म्हणजे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासूनच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढहोत आहे.

यामुळे आता राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असल्याचं दिसत आहे. राज्यात आज 23065 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 52,41,833 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 92.76 टक्के इतका झाला आहे.

आज राज्यात 24,752 नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात सध्या 315042 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 10 दिवसांत राज्यात एकूण 415462 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe