मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची अरेरोवीची भाषा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना मनपाच्या सुविधा केंद्रात दाखले दिले जात आहेत. यातच या ठिकाणी दाखला मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येत आहे.

मात्र दाखला घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्यांकडून अरेरोवीची भाषा वापरली जात आहे. तसेच उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा प्रकार घडतो आहे. यामुळे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आपल्याच कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

महापालिकेच्या हद्दीतील रूग्णालयांमध्ये करोना रूग्ण उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर महापालिकेच्यावतीने अंत्यसंस्कार केले जातात. त्याच्या मृत्यूची नोंद महापालिकेकडे होत आहे. यामुळे मृत्यूचे दाखले महापालिकेकडून दिले जात आहेत.

या दाखल्यासाठी जिल्ह्याभरातून लोक जुन्या महापालिकेच्या कार्यालयाबाहेरील सुविधा केंद्रात गर्दी करत आहेत यामुळे जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे करोना संसर्गाचा धोका होण्याची भीती आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

तसेच नागरिक तासंतास दाखला मिळवण्यासाठी रांगेत उभा राहतात मात्र आलेल्या नागरिकांशी संबंधित कर्मचारी अत्यंत उद्धटपणे वागत आहे. विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे प्रकार देखील या ठिकाणी घडत आहे.

गरज नागरिकांना असल्याने याला उद्धट कर्मचाऱ्यांचे बोलणं निमूटपणे नागरिक ऐकून घेतात. मात्र या सर्वबाबींकडे आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देणें गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक करू लागले आहे. तसेच मनपाच्या या सुविधा केंद्राच्या बाहेर मनपाची काही सुविधा उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

मनपा प्रशासनाकडून तेथे कोणतेच नियोजन केले जात नाही. नागरिकांकडून शारिरीक अंतराचे पालन केले जात नाही. यामुळे करोना वाढीचा धोका आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe