अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही राहाता तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.
चार दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांची पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी चार दिवसांऐवजी दिवसाआड पाणी पुरवठा करावा,
अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना दिले आहे. अनेक कुटूंबातील कोणीतरी व्यक्ती करोनावर रुग्णालयात उपचार घेत आहे.
ज्या दिवशी नगरपालिका पाणी पुरवठा करते त्या दिवशी कुटूंबात पाणी भरण्यासाठी कोणीही नसेल तर पाण्यासाठी पुन्हा चार दिवस वाट पाहावी लागते.
पाणी साठवणुकीची क्षमता प्रत्येक कुटूंबाकडे पुरेशी नसल्याने पाण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करावा,
अशी मागणी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, भागवत लांडगे यांनी मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम