अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. अनेकांनी आपल्या नौकऱ्या गमावल्या आहेत.
तसेच काहीजण हताश होऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र अद्यापही परिस्थिती अशीच राहू लागल्याने आता काम करून पोट भरणारे काही हात आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहे.
शासनाकडून कोणताही अनुदान, आर्थिक मदत मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी काही जण गुन्हेगारीकडे वळाले आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरातील गुन्हेगारीचा आलेख हा वाढतच जाऊ लागला आहे.
शहरासह तालुक्यात सर्वच क्षेत्रात लॉकडाऊन आणि अन्य अडचणींमुळे मंदीची लाट अधिक तीव्र झाली आहे. जमीन, भूखंड घरांच्या किंमती खाली आल्या असून दुसरीकडे गरजू ग्राहक बाजारातील दलालांमुळे वेठीस धरला जात आहे.
यामुळे लॉकडाऊन तातडीने न हटल्यास सर्वसामान्य, गोरगरीबांसह व्यापारी हे मानसिकदृष्ट्या खचणार आहे. सध्या पाथर्डीच्या बाजारपेठ मंदीचा विषयच ठरतोय चर्चेचा. गेल्या दोन वर्षापासून बाजारपेठेचे अर्थचक्र बिघडले आहे.
अवैध धंदे राजरोस सुरू मात्र व्यापार्यांवर चोरट्या सारखे जगण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनचा परिणाम किरकोळ विक्रेता व ग्राहकांवर झाला आहे. कोणतीही आवश्यक वस्तू ज्यादा भावा शिवाय मिळत नाही.
जिल्ह्यात रोजगाराची साधने निर्माण करण्यात व उपलब्ध साधने टिकवून ठेवण्यात लोकप्रतिनिधींना स्वारस्य नाही.
काम करणार्या हातांना काम नसल्याने तेच हात आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत. बाजार पेठेतील मंदीच्या लाटेने ग्राहक, विक्रेते व व्यापार्यांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन हटून परिस्थिती लवकर पूर्वपदावर यावी यासाठी शासन प्रशासन पातळीवर प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम