महाराष्ट्रात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये मोठे नुकसान करणारे ‘यास’ चक्रीवादळ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये धडकू शकते.

मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे जिल्ह्यातील अस्ताव्यस्त होऊ शकते, असे संकेत नागपूर येथील हवामान विभागाने दिले आहेत. चक्रीवादळामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा जबर फटका बसू शकतो.

या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यास चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या 24 तासांत विदर्भात पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे.

यास चक्रीवादळ ओदिशातून, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत धडकण्याची शक्यता आहे. छत्तीसगडजवळच्या गोंदिया, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये यासचा सौम्य प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या भागात तासी 140 ते 150 किलोमिटर वेगाने वारे वाहू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe