साप चावल्याने तेरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  एका तेरा वर्षाच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला असल्याची घटना कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे.

स्नेहल राहुल काळे (वय -१३) असे मयत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्नेहल ही रात्री टेरेसवर झोपलेली होती.

रात्री साडेअकरा वाजता टेरेसवरून उठून खाली खोलीकडे जात असताना तिला सर्पदंश झाला. दरम्यान स्नेहलला तात्काळ कर्जत येथे उपचारासाठी नेण्यात आले.

कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयातून नगर येथे नेत असताना दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News