या कारणामुळे उदयनराजे भोसले यांनी मागितली मुस्लिम समाजाची माफी 

Ahmednagarlive24
Published:
सातारा :- लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेत भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चुकीचे आहे. या वक्तव्याशी आपला संबंध नाही. पण तरीही आपण मुस्लिम समाजाची माफी मागत आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालतो.
जातपात आपण कधीच मानत नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी देत ‘मी सॉरी म्हणायला या ठिकाणी आलो आहे. माझी तुम्हाला शपथ आहे, असा कोणी करणारा असेल तर त्याला खाली खेचा आणि ठेचा, पण माझ्यावरती त्याचे गालबोट नको,’ असे वादग्रस्त वक्तव्यही या वेळी उदयनराजे यांनी केले.

 

कराडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसराची उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली.
तत्पूर्वी राजेंद्रसिंह यादव यांच्यासह कराडच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी येथील हॉटेल पंकजवर मुस्लिम समाजाशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मुस्लिम समाजाची माफी मागितली.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment