जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार बालकांसाठी खास आयसीयू सेंटर

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. यातच या लाटेमुळे मोठा कहर जिल्ह्यात झाला आहे. यापाठोपाठ आता देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.

ही तिसरी लाट बालकांसाठी घातक आहे. याचाच विचार करून आमदार संग्राम जगताप यांनी सिव्हीलमध्ये बालकांसाठी खास आयसीयू सेंटर उभारले जाईल, असे आश्‍वासन दिले. आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत शहरातील प्रमुख नामवंत बालरोग तज्ज्ञांची बैठक आज झाली.

बैठकीला अनेक बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. सुरूवातीला डॉक्टरांनी त्यांच्या अडचणी सांगत उपचाराबद्दल माहिती दिली. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तिसर्‍या लाटेचा धोका आहे. तसेच पावसाळ्यात फ्ल्यू आणि निमोनियांचे पेशंट वाढतात.

त्यामुळे बालकांना इन्फ्लुंझा लस देण्यात यावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली. त्यावर लसीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलून मार्ग काढू असे आमदार जगताप यांनी सांगितले. तसेच शहरातील जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी खास आयसीयू तयार करण्याचे आश्‍वासन यावेळी जगताप यांनी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe