अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची नितांत गरज भासत होती. यासाठी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये ऑक्सिजन प्लांटची निर्मित सुरु आहे.
यातच आता शनिशिंगणापूर येथे नामदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांमुळे एक नवीन ऑक्सिजन प्रकल्प उभा राहतो आहे.
शनी शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात दररोज 50 सिलेंडरचा नवीन ऑक्सिजन प्रकल्प उभा राहणार आहे. त्यासाठीच्या सर्व प्राथमिक बाबी पूर्ण झाल्या असून नुकतीच कंपनीच्या अधिकार्यांनी जागेची पाहणी केली असून प्रकल्पाचे काम पुढील आठवड्यात चालू होणार आहे.
करोनाची तिसरी लाट लक्षात घेता येणार्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गेल्या एक महिन्यापासून नामदार शंकरराव गडाख प्रयत्नात आहे.
दरम्यान शनीशिंगणापूर मध्ये सुरु होत असलेल्या या प्लांटमध्ये 15 हजार लिटर ऑक्सिजन गॅस प्रति तासाला तयार होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी कंपनीच्या अधिकार्यांनी शनीशिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात जागेवर जाऊन पाहणी केली. शिंगणापूर येथे हा प्रकल्प झाल्यावर तालुक्यातील रुग्णांसाठी खूप मोठी मदत होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम