अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-अकोले पोलिसांनी तालुक्यातील कोतुळ येथे कल्याण मटका खेळताना छापा मारून 22 हजार 200 रुपये मुद्देमालासह 11 जणांना ताब्यात घेतले तर टाहाकारी व निळवंडे येथे अवैद्य दारु विक्री करताना दोघांना 1800 रूपयांच्या मुद्देमालासह अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली कि, कोतुळ येथील सार्वजनिक मुतारीच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाण कोतुळ येथे काही इसम जुगार खेळात आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाड टाकली.
पोलिसांनी याप्रकरणी हसन उस्मान अत्तार, रोहिदास भिमा कचरे, (कोतुळ), सुरेश विष्णू खंडवे, भाऊसाहेब भिमा मधे, पप्पु पिनाजी खंडवे, बारकु बाळु पारधी (पांगरी), संपत दगडु भुरके, सुधाकर महादु देशमुख, दिपक गुलाब लोखंडे, अकिल अबु अत्तार (रा. कोतुळ) नंदु भगवंता खरात (साठेनगर, कोतुळ) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी 22 हजार 200 रूपयांच्या रोख रक्कमेसह जुगाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. दुसर्या कारवाईमध्ये तालुक्यातील टाहाकारी येथे घराच्या आडोशाला रामदास महादु जाधव (रा.टाहाकारी) हा इसम विनापरवाना दारु विक्री करताना व बाळगताना आढळुन आला.
व दुुसरी निळवंडे येथील आकाश बाळासाहेब अवचिते हा इसम बेेेकायदा विनापरवाना देेशी दारु विक्री करताना आढळुन आल्याने अश्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम