अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नगर जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची संख्येंचा विक्रमी आकडा दिसून येत होता.
मात्र आता काहीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. दुसऱ्या लाटेत अत्यंत सक्रिय झालेला कोरोनाचा विषाणू आता हळूहळू जिल्ह्यातून काढता पाय घेत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होऊ लागले आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी २२९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर १४०८ नवे रुग्ण आढळले. नवीन कोरोनामुक्तांसह जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ११८६३ इतकी आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम