अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोना लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. राज्यभरात मात्र लिलाव सुरु आहेत. पावसाळ्यात कांदा साठवण क्षमता नसल्याने तो पूर्ण खराब होण्यापूर्वीच विकणे गरजेचे आहे.
त्यामुळे बाजार समितीने लिलाव तत्काळ सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यासंदर्भात अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले, शिवसेना नेते प्रदिप हासे, शेतकरी अतुल लोहोटे, सुरेश नवले, नीलेश तळेकर, केशव वाकचौरे, अमोल पवार यांनी नायब तहसीलदार ठकाजी महाले यांना शुक्रवारी निवेदन दिले.
लिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी चाळी व इतर व्यवस्था नाही.
वादळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन मोठे नुकसान होऊ शकते. महिन्यापासून लिलाव बंद करुन प्रशासनाने शेतकरी, व्यापाऱ्यांची पिळवणूक चालवली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम