वृत्तसंस्था :- आता माकडांनाही मोबाइलने वेड लावले आहे की, काय? असा प्रश्न पडला आहे. अशीच एक घटना चीनमध्ये घडल्याचे दिसून आले.
पूर्व चीनमधील जिंगसू राज्यात माकडाने मनसोक्त अशी ऑनलाइन शाॅपिंग केल्याचा किस्सा गाजतो आहे. या रंजक प्रकरणाची माहिती अशी की, ६ नोव्हेंबर रोजी प्राणी संग्रहालयाच्या अधीक्षका माकडासाठी खाण्यापिण्याचे साहित्य ठेवण्यासाठी पिंजऱ्यात गेली होती.
परंतु ती मोबाइल तेथेच विसरली. नंतर माकडाने मोबाइल उचलला आणि धडाधड बटन दाबण्यास सुरुवात केली. जेव्हा अधीक्षका मोबाइल घेण्यासाठी परत आली तेव्हा तिला मोबाइलवर अनेक नोटिफिकेशन ऑनलाइन शॉपिंगच्या साईटवरून आलेले होते.