वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या चार दिबासांपासून पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता. यातच जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासूनच ढग दाटून आले होते.

व रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली . यातच श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात काल वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला.

या पावसामुळे काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान वादळमुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.

खानापूर परिसरात बिगर मोसमी पावसाने वादळात शेतातील घराचे छतावरील पत्रे उडून गेले तर विजेचे खांब उन्मळून पडल्राने अनेक शेतकर्‍रांचे नुकसान झाले.

घरावरील पत्रे उडून गेली :- वादळी पावसानेत खानापूर शिवारात बाळासाहेब बाबुराव आदिक, अशोक दगडू पंडीत रांचे घराचे पत्र्याचे छत उडून गेल्राने प्रचंड नुकसान होऊन संसारोपरोगी सामान उघड्यावर आले.

तर वरूण बाबासाहेब आदिक रांच्रा शेतातील रोहित्रासह बाजुच्रा शेतकर्‍राचे शेतातील विजेचे खांब जमिनदोस्त झाल्याने या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe