माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; जबरदस्तीनं गर्भपात….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- एका प्रसिद्ध अभिनेत्रीने माजी मंत्र्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही अभिनेत्री तमिळ चित्रपटसृष्टीतील आहे. तिने अण्णा द्रमुकचे माजी मंत्री डॉक्टर मणिकंदन यांच्यावर आरोप केला आहे.

तिच्या आरोपांनुसार, ती मूळची मलेशिया येथील असून मणिकंदन यांच्याशी तिचा 2017 मध्ये संपर्क आला. तेव्हापासून लग्नाचे आमिष दाखवून मणिकंदन यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

गेली पाच वर्षं हे सुरू होते. मात्र, लग्नाचा विषय आल्यानंतर मणिकंदन यांनी नकार दिला. तसेच ती या संबंधांमुळे गर्भवती झाली तेव्हा तिचा जबरदस्तीने गर्भपात करवला गेला.

तसेच या प्रकरणी कुठेही वाच्यता केल्यास तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली, असे आरोप अभिनेत्रीने केले आहेत.

या प्रकरणी अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यासाठी पुरावा म्हणून तिने मणिकंदन यांच्यासोबतचे काही फोटोही पोलिसांना दिले आहेत. त्यावरून पोलिसांनी मणिकंदन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News