बेजबाबदार नगरकर… नियमांना पायदळी तुडवत भरले 01 कोटीहुन अधिकचा दंड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे लॉकडाऊन, कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना बाहेर फिरण्यास मनाई आहे.

मात्र असे असतानाही नगरकरांनी आपला बेजबाबदारपणा आर्थिक दंडाच्या रकमेतून दाखवून दिला आहे. नगर शहर पोलिसांनी दोन महिन्याच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणार्या 33 हजार 56 जणांवर कारवाई करून तब्बल एक कोटी एक लाख 53 हजार 295 रूपयांचा दंड वसूल केला.

पोलिसांनी ही कारवाई 22 मार्च ते 27 मे दरम्यान केल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी दिली. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने 22 मार्चपासून कडक निर्बंध लागू केले.

प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली.

कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई केली जात आहे.

शहरात दररोज चौकाचौकात नाकाबंदी करून ही कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे, विनाकारण बाहेर फिरणे,

दुचाकीवर डबलसीट प्रवास करणे, विनामास्क, मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन, दुकाने उघडी ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe