अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोणतेही सरकारी काम असो ते लगेच होणार नाही अशी भावनांचा सर्वसामान्यांच्या मनात झालेली असते. त्यातच विकासकामे म्हंटली तर त्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागतात हा आजवरचा इतिहास आहे.
मात्र साताऱ्यात एक कौतुकास्पद गोष्ट घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला.
यामध्ये २५. ५४ कि.मी. रस्ता हा अवघ्या १४ तासात पूर्ण करुन विजापूर-सोलापूर २५.५४ कि.मी. रस्त्याचा विक्रमही मोडला असून नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे.
३० किलोमीटरचा हा रस्ता रविवार, दि. ३० मे २०२१ रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री २ वाजेपर्यंत तयार करण्यात आला. साडेतीन मीटर रुंद आणि ३० किलोमीटर लांबीचा हा रस्ता पुसेगाव, जायगाव, औंध, म्हासूर्णे असा होता.
जवळपास ४७४ कामगार आणि २५० वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले. कोविडसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार,
मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. हा उपक्रम कौतुकास्पर असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील अभियंते व उद्योजक, कंत्राटदार यांच्यासाठी दिशादर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम