अहमदनगर जिल्ह्यात उद्यापासून काय असेल सुरु आणि बंद ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  नगर शहर व जिल्ह्यातील कोविड निर्बंध कायम ठेवण्यात आले असून, बाजारपेठा,आठवडे बाजार, धार्मिक स्थळे व विवाहांना बंदी असणार आहे. मात्र, दूधसंकलन, वाहतूक व प्रक्रियेवरील निर्बंध हटवण्यात आले असून, दूध विक्री, भाजीपाला-फळे,किराणा, मांस विक्रीला सकाळी 7 ते 11 या दरम्यान परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांचे नवे आदेश जारी केले. ब्रेक द चेनअंतर्गतचे निर्देश व केंद्र शासनाच्या आयसीएमआर पोर्टलवरील 29 मे 2021 रोजीसंपणार्‍या आठवड्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट तसेच जिल्हाशल्य चिकित्सकांकडून मिळालेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्ण संख्येच्या माहितीवरवरिष्ठ अधिकार्‍यांची चर्चा झाली. 

या बैठकीदरम्यान अहमदनगर जिल्ह्याचा 29 मे 2021रोजी संपणार्‍या आठवड्यातील आयसीएमआर पोर्टलवरील कोविड पॉझिटीव्हीटी रेट हा 10 टक्के पेक्षा कमी असला तरी अहमदनगर जिल्ह्यात 29मे 2021 रोजी ऑक्सिजन बेडवरील रुग्ण संख्येचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण 40 टक्क्यापेक्षा अधिक असल्याने 

आणि पॉझिटिव्हीटी रेट वऑक्सिजन बेडची उपलब्धता याचा विचार करता शासनाचे 30 मे रोजीचे ब्रेक द चेनअंतर्गत आदेशातील मुद्दा क्र.6 हा अहमदनगर जिल्ह्यासाठी लागू होत असल्याने निर्बंध वाढविणेआवश्यक असल्याबाबत सर्व सदस्यांचे एकमत झाल्याने जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवले गेले आहेत.

असे असतील नवे निर्बंध

  • -हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवादेण्यास मनाई असेल मात्र होम डिलेवरी चालू राहील –
  • धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील -आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील -भाजीपाला, फळे बाजार बंद राहतील फक्त द्वार वितरणास मान्यताराहील.
  • -दारू दुकाने बंद राहतील (फक्त व्दार वितरणास मान्यता राहील)
  • -टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरितावाहतुकीस चालू राहतील
  •  -चार चाकी खासगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांकरितावाहतुकीस चालू राहतील
  • -दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरितावापरास परवानगी राहील

* सर्व खाजगी कार्यालये पुर्णतः बंद राहतील कोविड -साथरोग व्यवस्थापनाशी थेटपणे संबंधीत सरकारी कार्यालयेवगळता इतर सर्व सरकारी कार्यालये फक्त 15 टक्के उपस्थितीवर कार्यरत राहतील

* दूध संकलन, वाहतूक व प्रक्रिया कुठल्याही निर्बंधाविना चालू राहतील.-कटींग सलून, स्पा, ब्युटीपार्लर पूर्णतः बंद राहतील-

शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पुर्णतः बंद राहतील -स्टेडिअम , मैदाने पुर्णतः बंद राहतील -विवाह समारंभास बंदी राहील –

चहाची टपरी-दुकाने पुर्णतः बंद राहतील -अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंदराहतील -सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह, संग्रहालय पूर्णतः बंदराहतील –

सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम पुर्णतः बंद राहतील -सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील -सेतू ई-सेवा केंद्रे, आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील –

व्यायाम शाळा , स्विींमिंग पुल , सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग-इव्हीनिंगवॉक पूर्णतः बंद राहील-बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील

ह्या गोष्टी असतील सुरु – 

  • किरकोळ विक्रीची किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 –
  • दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी 7 ते 11 –
  • भाजीपाला विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी 7 ते 11
  • फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी 7 ते 11
  • कृषी उत्पन्न बाजार समित्या । उपबाजार समित्या-सकाळी 7 ते11
  • अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री -सकाळी 7 ते 11-
  •  कृषी संबंधीत सर्व सेवा-दुकाने-सकाळी 7 ते 11
  • पशुखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11

पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरीता पेट्रोल/डिझेल/सीएनजी/एलपीजीगॅस विक्री -सकाळी 7 ते 11 – पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यकसेवा/मालवाहतुकीकरीता डिझेल/पेट्रोल विक्री- नियमित वेळेनुसार.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe