आज अहमदनगर शहरातील लसीकरण बंद असणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र या लसीकरणाला नेहमीच अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे.

लसीच्या तुतडवण्यामुळे अनेकदा लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत असतात. दरम्यान आज १ जून रोजी लसीकरणाचा तुटवडा आला असल्याने आज नगर शहरातील लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोरोनावर लस हाच एकमेव उपाय असल्याने लसीकरणासाठी नगरकर आरोग्य केंद्रावर रोज गर्दी करत आहेत. शहरातील लसीकरण केंद्रही महापालिकेने वाढवलेले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून लसीचे डोस मर्यादित येत असल्याने लसीकरणाचा गोंधळ सुरूच आहे.

त्यातच सोमवारी (३१ मे) महापालिका प्रशासनाला जिल्हा प्रशासनाकडून लसीचे डोस मिळाले नाही. त्यामुळे उद्या एक जून रोजी अहमदनगर शहरातील लसीकरण बंद असणार आहे.

अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. लसीचे नव्याने डोस मिळाल्यानंतर लसीकरण केंद्र पूर्ववत सुरू केले जाईल,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe