अबब ! गंजीत लपवून ठेवला दहा पोते गांजा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- एका कडब्याच्या गंजीत लपवून ठेवलेले तब्बल गांजाची दहा पोती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून जप्त केली. या गांजाची किंमत जवळपास सव्वा कोटी रुपये आहे .

या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे कि , कळंब तालुक्यातील मस्सा शिवारात कडब्याच्या गंजीत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गांजाची पोती ठेवली असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या टीमने मस्सा शिवारात

एकाच्या शेतीतील कडब्याच्या गंजीला दडवून ठेवलेला दहा गांजाची पोती जप्त करून कळंब पोलिस ठाण्यात आणली. दरम्यान,गांजा कुठून आणण्यात आला, कुठे विक्री करणार बाबतची माहिती पोलिस घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!